भाजप महापौरांचा शरद पवारांना खाली वाकून चरणस्पर्श करत नमस्कार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पिंपरी चिंचवडच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. आज (दि. 16) शरद पवार व भाजपच्या महापौर माई ढोरे यांची भोसरी येथील रुग्णालयातील आयसीयू उद्‌घाटानप्रसंगी भेट झाली. यावेळी माई ढोरे यांनी पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच खाली वाकून चरणस्पर्श केल्याने पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

भोसरी येथील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये शरद पवार यांच्या हस्ते आयसीयू विभागाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यावेळी भाजपच्या महापौरांनी त्यांचे स्वागत करताना खाली वाकून चरणस्पर्श केले. भाजपच्या विद्यमान महापौरांनी शरद पवार यांचा आशीर्वाद घेतल्याने त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

याबाबत महापौर माई ढोरे यांनी सांगितले की, मी भारतीय जनता पार्टीची महापौर आहे. शरद पवार हे सर्वच गोष्टींनी श्रेष्ठ आहे. त्यांच्या वयाचा मान-सन्मान ठेवेणे आवश्‍यक आहे. भोसरी येथील रुग्णालयात त्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. महापौर या नात्याने मी तिथे उपस्थित होते. त्यांचे स्वागत मी केले. त्यांच्या वयाचा मान म्हणून मी दर्शन घेतले. यामध्ये वेगळ्या गोष्टींची चर्चा होण्याचे काही काम नाही. थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेणे आपली संस्कृती आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.