पुणे – भाजपा-महायुतीचे २१४ पुणे कॅन्टोन्मेंटचे अधिकृत उमेदवार म्हणून सुनिल कांबळे यांनी (Sunil Kamble) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार कांबळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. (Maharashtra Assembly Election 2024)
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी राज्यमंत्री, ज्येष्ठ बंधू तथा भाजपा अनुसूचित मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष दिलीप भाऊ कांबळे, शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, भाजपा शहर सरचिटणीस महेश पुंडे, माजी नगरसेवक उमेश गायकवाड, धनराज घोगरे, माजी नगरसेविका किरण ताई मंत्री, भाजपचे माजी गटनेते गणेश बिडकर, कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष विवेक यादव, माजी नगरसेविका मनिषाताई लडकत, प्रियांकाताई श्रीगिरी, माजी नगरसेवक समवेत पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते आणि कॅन्टोन्मेंट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune Cantonment Assembly Constituency)
अर्ज भरण्यापूर्वी कांबळे यांनी भवानीमाता मंदिर येथे देवीची आरती केली. त्यानंतर भवानी पेठ, जुना मोटार स्टँड, पवार हाऊस चौक, रॅली काढली. नरपतगिरी चौकात याचा समारोप करण्यात आला. त्यानंतर, बांधकाम भवन येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यात आला. यावेळी कांबळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
“पक्षाने मला पुन्हा संधी दिली आहे. त्यासाठी, मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. मागील पाच वर्षात मतदार संघात केलेले काम आणि मतदारांचा माझ्यावर असलेला विश्वास यांच्या बळावर मी पुन्हा विजयी होणार याची मला खात्री आहे.” – सुनिल कांबळे (उमेदवार, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ)