“…तर भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणे महागात पडेल”

मुंबई – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आलाय. सवदी यांनी आज, ‘मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करावा अशी सीमा भागातील जनतेची मागणी असून तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित घोषित करावे’ असे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रामध्ये त्यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता सवदी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने निषेध नोंदवताना तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित करण्याचा भाजपचा कुटील डाव उघड झाला आहे. परंतु भाजपने मुंबईकडे वाकड्या नजरेने जरी पाहिले तर महाराष्ट्रात राजकारण करणे त्यांना महागात पडेल, असा इशारा दिला आहे.
सावंत यांनी सवदी यांच्या विधानाचा निषेध करतानाच एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये त्यांनी, ” लक्ष्मण सवदी यांच्या विधानातून केंद्रातील मोदी सरकाराचा कुटील डाव स्पष्ट झालेला आहे. मुंबईला कमकुवत करण्याचा, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे भाजपाचे षडयंत्र राहिले आहे.
Mumbai should be included in Karnataka. Until that is done, I request Central govt to declare Mumbai as a Union Territory: Karnataka Deputy CM Laxman Savadi https://t.co/NQtxvePitR pic.twitter.com/Sw6fQcMCLO
— ANI (@ANI) January 28, 2021
“याच मोहिमेचा भाग म्हणून मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये हलवण्याचा, मुंबईतील उद्योगधंदे व प्रकल्प गुजरात व इतरत्र हलवण्याचे काम मागील सहा वर्षापासून बिनदिक्कतपणे सुरु असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र गप्प बसून होते. मुंबईला केंद्रशासित करण्याचा हा डाव होता,” असे आरोप लागवलेत.
सीबीआय, एनसीबी, आयकर विभागाचा गैरवापर
यावेळी बोलताना सावंत, “कधी सीबीआय, एनसीबी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांकडून येथील उद्योग- व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भिती निर्माण केली जात आहे, बॉलिवूडचाही छळ मांडला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलवण्यासाठी केलेले प्रयत्न हे असेच सुरु झालेले नाहीत. या घटनातून भाजपचा कुहेतू पद्धतशिरपणे सुरु होता हे स्पष्ट दिसते. मोदी व भाजपला महाराष्ट्राबद्दल इतका आकस का आहे, हा प्रश्न विचारून १०५ हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. तसेच मुंबईची जनता भाजपचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही,” असं देखील म्हणाले.
मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा भाजपा आणि मोदी सरकारचा कुटील डाव उघड झाला आहे. मुंबईकडे वाकड्या नजरेने बघितले तर भाजपावाल्यांनो महाराष्ट्रात तुम्हाला राजकारण करणे कठीण होईल. महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही https://t.co/V6cVB7FZCx pic.twitter.com/RRgVSBMY1b
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 28, 2021





