पणजी विधानसभा : पोटनिवडणुकीत पर्रीकरांची जागा भाजपने गमावली

पणजी – लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीत भाजपा देशभर जिंकला असला तरी तरी गोव्याच्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा मतदारसंघ असलेल्या पणजी येथे कॉंग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. पणजीच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे अटानेसियो मॉनसरेट यांचा 1 हजार 774 मतांनी विजय मिळाला आहे. त्यामुळे भाजपाला या राज्याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

पणजीची विधानसभा मतदारसंघातील जागा पर्रीकर यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती. 1994 सालापासून पर्रीकर हे जागी निवडून आले होते. पण त्यांच्या निधनानंतर या जागेसाठी कॉंग्रेसच्या अटानेसियो मॉनसरेट यांच्याविरुद्ध भाजपने सिद्धार्थ कुंकळीकर यांना उमेदवारी दिली होती. पण भाजपची जागा कायम राखण्यात कुंकळीकर यांना अपयश आले.

गोवा विधानसभेत एकूण 40 जागा आहेत. त्यापैकी 12 जागा भाजपकडे आहेत. पण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई आणि 3 अपक्ष यांच्या सहकार्याने येथे भाजप सत्तेत आहे. तर कॉंग्रेसकडे 15 जागा आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here