विखे पाटलामुळे भाजपचे नुकसान – राम शिंदे

माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. विखे पाटील यांना भाजपात घेऊन काही फायदा झाला नाही उलट भाजपचे नुकसानझाल्याचं ते म्हणाले. भाजपातील पराभूत उमेदवारांची आज नाशिक इथे बैठक पार पडली. भाजपतील काही नेत्यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप राम शिंदें यांनी केला.

विखे पाटलांचा कोणताही फायदा उमेदवारांना झाला नसल्याचा दावा पराभूत उमेदवारांनी केला आहे. पक्षातील नेत्यांनीच विरोधात काम केल्यामुळे प्रभाव झाला असे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.

इतर पक्षातून आलेल्या लोकांमुळेच भाजपचा प्रभाव झाला असे शिवाजी कर्डीले यांनी सांगितले. मात्र एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी बैठकीला दांडी मारली.वैयक्तिक कामामुळे आपण बैठकीला हजर राहू शकले नाही असे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.