“आपण रोज घरी गेलात की बायका पोर भांडत असतील आणि…” – नवाब मलिकांना भाजप नेत्याचा टोला

मुंबई – राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येस ओहोटी लागली असल्याचं दररोज सापडणाऱ्या  नव्या बाधितांच्या आकडेवारीतून समोर येतंय. रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले असतानाच राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय.

गेल्या काही दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व काही केंद्र सरकारने  करायचे तर राज्य सरकारने काय माशा मारायच्या? असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे सरकारला टोला लगावला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी फडणवीस यांना माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय? असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती. या वादात आज भाजप आमदार राम सातपुते यांनी देखील उडी घेतली आहे.

राम सातपुते यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून, “आम्ही समजू शकतो मलिकजी आपण मंत्री असताना आपला जावई ड्रग केस मध्ये तुरुंगात आहे ,आपण रोज घरी गेलात की बायका पोर भांडत असतील आणि म्हणत असतील जावयाला बाहेर काढू शकत नाही.. असो आपली अवस्था आम्ही समजू शकतो .मला तर वाटत आपण मनोरुग्ण झाला आहात. सांभाळा स्वतःला..” असा टोला लगावला.

दरम्यान,  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानेच करोना काळात महाराष्ट्राला सर्वाधिक मदत देण्यात आली, मात्र त्याचा योग्य वापर करून घेण्यात राज्य शासन अपयशी ठरले.” असा आरोप केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.