मुंबई – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काही वेळातच हाती येणार आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भाजपचे समाधान अवताडे यांनी विजयी आघाडी घेतली असून निकालाची औपचारिक घोषणा होणं बाकी असल्याचे समजते.
पंढरपुरचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक लागली होती. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके तर त्यांच्याविरोधात भाजपचे समाधान अवताडे अशी प्रमुख लढत होती.
भगीरथ भालकेंच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली. तर भाजपचे सर्व प्रमुख नेते देखील अवताडेंच्या प्रचारार्थ मैदानात उतरले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. मात्र, निकालांमधून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार भगीरथ भालकेंचा येथून पराभव होत असल्याचं चित्र असल्याने भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय.
भाजप नेते नितेश राणे यांनी तर महाविकास आघाडीतील आमदारांना थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर देऊ केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर एक संदेश पोस्ट केलाय. ते लिहतात, “पंढरपुर पोट निवडणुकीमधे MVA मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री पर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले.. तरीही लोकानी नाकारले.. MVA मधल्या आमदारांना हा संदेश आहे.. येणारा धोका समजा आणि.. एक पाउल पुढे टाका.. भा ज प हा एकच पर्याय आहे.. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे!!”
पंढरपुर पोट निवडणुकीमधे MVA मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री पर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले..
तरीही लोकानी नाकारले..
MVA मधल्या आमदारांना हा संदेश आहे..
येणारा धोका समजा आणि..
एक पाउल पुढे टाका..
भा ज प हा एकच पर्याय आहे..
महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे!!— nitesh rane (@NiteshNRane) May 2, 2021