‘इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल’

तळीये गावातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर भाजप नेत्यांची टीका

मुंबई –  महाड येथील पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथक बचावकार्य करीत आहे.

दरम्यान, महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 40 लोक ठार झाले आहेत. दरडीखाली अख्खं गावच नेस्तानाबूत झाले असून त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करणार आहेत.

त्यांच्या या दौऱ्याच्या  पार्श्वभूमीवर  भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या या धावत्या दौऱ्यावर टीका केली आहे. इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर लगावला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.