#व्हिडीओ : भाजपचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना अखेर अटक

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर एका तरुणीने लैगिंक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर चिन्मयानंद यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आता या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या टीमने चिन्मयानंद यांना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.


आज सकाळी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या टीम स्वामी चिन्मयानंद यांना ट्रॉमा सेंटर येथे घेऊन गेली होती. स्वामींना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखवल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वामी चिन्मयानंद यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली होती त्यामुळे स्वामींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी एसआयटीची टीम आश्रमात पोहोचली. गुरुवारी दुपारपर्यंत स्वामी चिन्मयानंद यांची प्रकृति उत्तम होती परंतु, रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. दरम्यान, हृदयाच्या समस्येमुळे डॉक्‍टरांनी केजीएमसी लखनऊला जाण्याचा चिन्मयानंद यांना सल्ला दिला, पण संध्याकाळी आपली प्रकृती सुधारत असल्याचे सांगत चिन्मयानंद आश्रमात परत आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×