नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलेल्या अमित शाहंना एका भाजपा नेत्याने चप्पल आणून घालायला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीने या घटनेचा व्हिडिओ ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला आहे.
अमित शाह सध्या हैदराबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी ते एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर तेलंगणा भाजपा प्रमुख बंदी संजय कुमार यांनी अमित शाहंच्या चपला आणल्या आणि त्यांना घालायला दिल्या. तेलंगणा राष्ट्र समितीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्वीटरवरुन शेअर केला आहे. ‘तेलंगणासाठी अभिमान’ म्हणत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे पुत्र के.टी. रामाराव यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
గుజరాత్ నాయకులకు ఉరికి ఉరికి చెప్పులు తొడగడం
తెలంగాణ ఆత్మగౌరవమా ? ?#TelanganaPride@KTRTRS pic.twitter.com/5lp90MCRzw— krishanKTRS (@krishanKTRS) August 22, 2022
काँग्रेसचे माजी नेते राजगोपाल रेड्डी यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. पक्षात स्वागत करताना, रेड्डी यांचा भाजपमध्ये प्रवेश ही केसीआर सरकारच्या समूळ उच्चाटनाची सुरुवात आहे.
केसीआर सरकारने तेलंगणातील जनतेच्या विश्वासघात केला. केसीआर सरकार तेलंगणा मुक्ती दिन साजरा करत नाही. सप्टेंबरमध्ये तेलंगण मुक्ती दिन साजरा करू, असे वचन दिले होते. मात्र, केसीआर सरकारने त्यांचे आश्वासन पूर्ण केले नाही, असा हल्लाबोलही केला होता.