#Video : नितीन गडकरींना पुन्हा एकदा व्यासपीठावर आली भोवळ; सध्या त्यांची प्रकृती स्थिर

शिर्डी : भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. नितीन गडकरींना शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना अचानक भोवळ आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

नितीन गडकरींना पुन्हा एकदा व्यासपीठावर आली भोवळ

शिर्डी : भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. नितीन गडकरींना आज दुपारी शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना अचानक भोवळ आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती मिळाली आहे… सविस्तर वाचा… https://bit.ly/2PzWPhZ

Posted by Digital Prabhat on Saturday, 27 April 2019

‘शिर्डीतील धरणाचे काम सहा महिन्यात सुरू होईल, मी तुम्हाला पाणी दिल्याशिवाय राहणार एवढं वचन देण्यासाठी इथं आलोय, म्हणून तुम्ही भाजप आणि एनडीएला निवडून द्या’, असं म्हणत नितीन गडकरींनी आपलं भाषण आटोपतं घेतलं आणि त्यानंतर लगेच त्यांना भोवळ आली.

गडकरी यांची प्रकृती अगदी ठणठणीत असून, काळजी करण्याचे कारण नाही. ज्या हितचिंतकांनी या काळामध्ये विचारपूस केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान, गडकरींना याआधीही अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.