मुंबई – समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आठ जणांना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे यामध्ये बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा ‘आर्यन खान’चा सुद्धा समावेश आहे.
या कारवाई या कारवाईवेळी के .पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले.
या आरोपांवर आता भानुशाली यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.’राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. भाजपचा याच्याशी (अटक) काहीही संबंध नाही. 1 ऑक्टोबर रोजी मला माहिती मिळाली की ड्रग्ज पार्टी होणार आहे. अधिक माहिती गोळा करण्यासाठी मी NCB अधिकाऱ्यांसोबत क्रूझवर गेलो होतो.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.