मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा, परंतु दुर्दैवाने तोही धंदा चालणार नाही कारण त्यांची भविष्यवाणी फोल ठरते, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व कुटुंबावर किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे आरोप केले असून या आरोपांचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
अल जेब्रिया कोर्ट संदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत आरोप केला आहे.
मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे असेही महेश तपासे म्हणाले.
Thackeray Sarkar’s Minister Chhagan Bhujbal, Ex MP Samir Bhujbal Ex MLA Pankaj Bhujbal’s ₹100 crore BENAMI Properties Siezed by Income Tax
ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांचा ₹100 कोटींचा बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 25, 2021
दरम्यान, भाजप नेते वारंवार असे बेछूट आरोप करुन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावे परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. उगीचच नेत्यांना बदनाम करण्याचे कट-कारस्थान ताबडतोब थांबवावे, असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.