मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या हे एक मनोरंजन करणारे पात्र आहे आणि असे मनोरंजन करणारे पात्र राजकारणात असावे आणि त्यांच्याकडून जनतेचे असेच मनोरंजन होत राहावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला.
मंत्रालयात येऊन फाईल चेक केल्याचा मुद्दा माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली.
ते पुढे म्हणाले की, किरीट सोमय्या हे मनोरंजन करणारे पात्र असून त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून जनतेचे मनोरंजन होत आहे. त्यांनी आणखी मनोरंजन करत राहावे. त्यांना आधी पक्ष गांभीर्याने घेत नव्हता आणि त्यांना आम्हीही गंभीरतेने घेत नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.