किरीट सोमय्यांची पोलिसांविरुद्धच पोलिसांत तक्रार, म्हणाले, ठाकरेंचे बंगले बघायला गेलो तर…

मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर जात असताना पोलिसांनी त्यांच्या घरी व सीएसटी स्टेशनवर अडवले असल्याचा आरोप करत त्यांनी आज नवघर पोलिस ठाण्यात पोलिसांविरुद्धच तक्रार दाखल केली आहे.

याविषयी माहिती देताना सोमय्या म्हणाले की, मंगळवारी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे. याबाबत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना कळवले आहे असे त्यांनी सांगितले आहे.

ठाकरेंचे बंगले बघायला गेलो तर ते काय करणार, ते मला घाबरतात. माझं तोंड बंद कऱण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेक नोटिसा पाठवल्या आहेत. मी जिथं जातो तिथं प्रवेश बंदी केली जात आहे. मला बेकायदेशीरपणे अडवलं जात असल्याचा आरोपी सोमय्या यांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.