पुणे – माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाजनांसह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या एका संचालकाचे अपहरण करून त्यांना सदाशिव पेठेतील एका फ्लॅटवर डांबून ठेवले व गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.