“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेला तांदूळ विकला, आता लस विकू नका”

मुंबई – गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून भीती वाटते, दुसरं काय?, असं ट्‌वीट करत भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

लसीच्या तुटवड्यावरुन भाजप नेते आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच करोना लसीचा साठा शिल्लक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले तर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार टोला लगावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.