मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते करोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
माझी कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार घेत असून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले आहे.
मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचेही आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.
I have tested positive for #Covid_19 today. I am under medication & advice all those who have been in contact with me to isolate themselves & seek medical guidance. I remain available here & via my office for hlp & assistance to Mumbaikars !
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 14, 2021