अमरावती : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. यादरम्यान भाजप नेते अनिल बोंडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत त्यांना डिचवले आहे. मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करु नये, असे बोंडे म्हणाले आहेत.
काय म्हणाले मनोज जरांगे ?
रक्ताची नातं असलेल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच आहे, त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश होईल. पण सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवली आणि ते मुख्यमंत्री झाले तरी ते ही गोष्ट साध्य करू शकणार नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशात आहेत. त्यामुळे कोणीही तशा वल्गना करू नये, समाजात फूट पाडण्याचं काम करू नये. यात सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचे होईल, असे अनिल बोंडे म्हणाले.
अमरावतीमध्ये विवारी भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनिल बोंडे यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे आता बोंडे विरुद्ध जरांगे वाद पेटण्याची शक्यता आहे.मनोज जरांगे हे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी लढा देत आहेत.त्यांनी विधानसभा निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत.