पिंपरी :- ‘कायदा आघाडी’ ही कोणत्याही राजकीय पक्षासाठी निर्णायक बाब आहे. संकटकाळात राजकीय पक्षाचं आस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी गुणी आणि ज्ञानी वकिलांची विचारसरणी मोलाची ठरते.
भारतीय जनता पक्षाकडे गुणवंत वकिलांची मोठी फळी असल्यामुळेच भारताच्या संविधानिक कसोटीवर आज आपला पक्ष सर्वश्रेष्ठ पक्ष म्हणून गणला जातो. याच श्रेय निश्चितच भाजपाच्या कायदा आघाडीला जाते, असे प्रतिपादन भाजपा कायदा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. उदय डबले यांनी केलं.
शहर भाजपा कायदा आघाडीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष तथा निमंत्रक अॅड. गोरखनाथ झोळ यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त लोकप्रतिनिधी, वकील बांधव, दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कायदा आघाडीच्या संपर्क प्रमुखपदी अॅड. एस. बी. चांडक, प्रचार प्रमुखपदी अॅड. सुभाष चिंचवडे, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अॅड. व्हिक्टर पिंटो यांच्यासह कार्यकारिणीत नवीन वकिलांच्या निवड नियुक्त्या करण्यात आल्या.
या सोहळ्यात नवनियुक्त विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्या वतीने मा. नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी सन्मान स्वीकारला. याशिवाय ज्येष्ठ विधिज्ञ एस. बी. चांडक, अॅड. सुभाष चिंचवडे, अॅड. व्हिक्टर पिंटो यांचा आणि वकील बांधवांच्या गुणवंत मुलांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कायदा आघाडीचे प्रदेश प्रभारी अॅड. धमेंद्र खांडरे, भाजपा राष्ट्रीय सदस्य सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, पुणे पिं.चिं. अॅडव्होकेटस बार असोशिएशनच्या अध्यक्षा अॅड. प्रमिला गाडे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, महिला अध्यक्षा अॅड. पल्लवी विघ्ने, अॅड. युवा अध्यक्ष हर्षद नढे, अॅड. रुपाली वाघेरे, अॅड. अमोल माने,
सरचिटणीस दत्ता झुळूक, अॅड. गोरख कुंभार, चिटणीस अॅड. सोपान पाटील, अॅड. परेश नरोटे, अॅड. व्ही. जी. पोखरकर, अॅड. पूनम स्वामीप्रधान, अॅड. प्रशांत पल्हारे, अॅड. किरण धावडे, अॅड. अमित चौघडे, अॅड. सीमा लांडे तसेच मोठ्या संख्यने वकील बांधव, गुणवंत विद्यार्थी, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. सदाशिव खाडे व अॅड. धमेंद्र खांडरे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
अॅड. गोरखनाथ झोळ यांनी कायदेविषयक जनजागृतीसाठी शिबिर, केंद्राच्या कायदेशीर योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरु असल्याची माहिती दिली. तसेच आगामी काळात प्रभाग स्तरावर ‘विधी सेवा केंद्रा’ची स्थापना करून त्याद्वारे लोकांना न्याय देण्याचा मानस व्यक्त केला.
त्यासाठी जवळपास सातशे वकिलांचे संघटन तयार करीत असल्याचे सांगितले. संघटनेतील वकिलांच्या कामांची वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांना पक्षाच्या राज्यस्तरीय चळवळीत सक्रीय करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
जेष्ठ विधिज्ञ चांडक यांनी शहरात भाजपच्या कायदा आघाडीचा विस्तार जोमात सुरु असून वकिलांना मोठ्या पदावर कामे करायला मिळत आहेत. त्यामुळे पक्षाला कायदेशीरपणे एखाद्या गोष्टीवर निर्णय घेता येत आहे.
त्यासाठी वकील महत्वाचा दुवा बनत असल्याचे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन अॅड. दत्ता झुळूक, अॅड. पल्लवी विघ्ने यांनी तर, आभार अॅड. गोरख कुंभार यांनी मानले.