‘भाजप तरुणांचे लक्ष विचलित करण्याचे काम करतंय…’

खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा भाजपावर हल्लाबोल

नवी दिल्ली : देशात उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात सध्या लव जिहादचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने लव जिहादच्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यावरूनच आता टीका सुरुवात होत आहे. चर्चेत असलेल्या लव जिहाद प्रकरणावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

भाजपाकडून लव जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागणीवर जोर दिला जात आहे. भाजपाकडून कायद्याची मागणी होत असताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांनी भाजपाला सुनावलं आहे.


“विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम १४ व २१ मोठं उल्लंघन होणार आहे. त्यांनी (भाजपा) घटनेचा अभ्यास करायला हवा. द्वेषाचा प्रसार आता काम करणार नाही. बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करतंय,” अशा शब्दात ओवेसी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.