मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतजी यांनी अनेकदा सांगितलं, आम्हाला आरक्षण नको आहे. आरक्षणमुक्त भारत असावा! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा हे काही वेगळे नाहीत. त्यामुळे आरक्षणाबाबतीत पुतणा मावशीचं प्रेम भाजपाने दाखवू नये. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर केली आहे.
आरक्षणाबाबतीत पुतण्या-मावशीचं प्रेम भाजपाने दाखवू नये.#आरक्षण#reservation pic.twitter.com/OtEMjomIWo
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 8, 2022
पुढे नाना पटोले म्हणतात की, “भाजपा ही ओबीसी, एस.सी, आदिवासी या कोणाच्याही समर्थनात नाही. ते आरक्षणाविरोधी आहेत. केंद्रात बसलेलं भाजपाचं सरकार तर संविधानाचा सन्मान करत नाही, मात्र काँग्रेसने नेहमीच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान केला, असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.