भाजप देशाला प्रगतीपथावर नेणारा पक्ष

भाजप नेते गणेश कुटे यांचे गौरवोद्गार

वाघोली (पुणे) – देशाच्या विकासासाठी झटणारा आणि देशाला प्रगतीपथावर नेणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष ओळखला जातो. जगातील सर्वात मोठा पक्ष अशी ख्याती असलेल्या भाजपचा स्थापना दिवस हा सामान्य कार्यकर्त्याचा खऱ्या अर्थाने उत्साहाचा दिन आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे यांनी केले.

यानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी घरावर पक्षाचा झेंडा लावून मोठ्या उत्साहात भाजपचा स्थापना दिन साजरा केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कुटे बोलत होते. वाघोली, आव्हाळवाडी येथे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अक्षय कुटे, अविनाश कुटे, संदेश कुटे, अनिकेत कुटे, स्वप्नील कुटे, विकास कुटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
वाघोली (ता. हवेली) ः येथे भाजपचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.