भाजपाने महाराष्ट्राचा अपमान केला- राष्ट्रवादी काँग्रेस

कोविड योद्धे आणि महाराष्ट्रातील जनता भाजपाला माफ करणार नाही

मुंबई: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अवघा महाराष्ट्र लढतोय. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर विविध उपाययोजना राबवतेय. त्याचबरोबर डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन अहोरात्र कोरोनाचा शर्थीने सामना करतोय. असे असताना महाराष्ट्राच्या एकत्रित प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी कमकुवत करणारे काळे आंदोलन करून भाजपाने महाराष्ट्राचा अपमान केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगली, कोल्हापूर महापूराच्या वेळी विरोधकांनी राजकारण करू नये, आपत्कालीन परिस्थितीत सर्वांनी मिळून काम करायला हवे, असे म्हटले होते. फडणवीस यांना त्यांच्याच या वक्तव्याची आठवण करून देण्याची वेळ दुर्दैवाने आली असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

सत्तेपलीकडे काहीही न दिसणाऱ्या भाजपाने या भयानक संकटकाळात एकजुटीने जनतेला साथ देण्याऐवजी राज्याचे अंगण हे रणांगण बनवले आहे. तुम्हाला कोरोनाविरोधातील लढाईला बळ द्यायचे नसेल, पण तुमच्या या काळ्या आंदोलनाला जनतेचा पाठींबा कधीच मिळणार नाही. कोविड योद्धे आणि महाराष्ट्रातील जनता यासाठी भाजपाला कधीही माफ करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर यासंदर्भात पोस्ट केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. गिरीश says

    महाराष्ट्राचा अपमान त्याच दिवशी झाला ज्या दिवशी संख्येने अगदी कमी असून शिवसेनेने खुर्ची साठी काँगेस, आणि बारामती काँगेस सोबत सत्ता स्थापन केली.

Leave A Reply

Your email address will not be published.