गुजरातेत भाजप सुसाट; सर्व सहा महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत

अहमदाबाद – पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र पंजाबमधील पराभवाची कसर भाजपने गुजरातमध्ये काढली आहे. येथील सर्व सहा महापालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

गुजरातमधील 6 महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यात राजकोट, भावनगर, जामनगर, सूरत, अहमदाबाद आणि वडोदरा या महापालिकांचा समावेश आहे. या निवडणुकीत भाजपने जुन्या नेत्यांना हटवून नवे चेहरे दिले होते. सध्या अहमदाबादेतील खाडिया वार्डमध्ये 3 जागांवर काँग्रेस तर एका जागेवर एमआयएमचा उमेदवार आघाडीवर आहे.  मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये भाजपला मोठं यश मिळत आहे.

दोन वाजेपर्यंतची स्थिती

अमहदाबाद – भाजप 83, काँग्रेस 18 जागांवर पुढे

वडोदरा – भाजप 45 तर काँग्रेस 7 जागी आघाडीवर

राजकोट – सर्व 52 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर

सूरत – भाजप 47, काँग्रेस 9 तर आप 9 जागांवर आघाडीवर

भावनगर – भाजप 25 तर काँग्रेस 5 जागांवर पुढे

जामनगर – भाजप 36, काँग्रेस 5, तर बसपा 5 जागी आघाडीवर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.