नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. 58 जगाच्या जिल्हापरिषदेत काँग्रेसने 26 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाला केवळ 10 जागा मिळवता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागांवर विजय मिळवला.
राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
दरम्यान पालघर जिल्हा परिषदही भाजपच्या हातातून निसटली आहे. पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेने जोरदार मुसंडी घेत भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी शिवसेनेला11 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 13 जागा मिळाल्या आहेत.
नागपूर जिल्हा परिषद एकूण जागा- 58
काँग्रेस-26
राष्ट्रवादी – 12
भाजप -10
शिवसेना -01
अपक्ष– 01
शेकाप- 01