मुंबई – पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना भाजपने रविवारी (5 जून) निलंबित केले. यानंतर नुपूरने माफीही मागितली आणि तिच्या कुटुंबाला असलेल्या धोक्याबद्दलही सांगितले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सहाय्यकाने पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अरब देशांनी भारतातील हिंदूवादी राष्ट्रीय पक्ष भाजपच्या विरोधात बहिष्कार मोहीम सुरू केली. या बहिष्कारामुळे भाजपने घाबरून नूपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना निलंबित केल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टमध्ये केला जात आहे. त्याचबरोबर पक्षाची धर्मनिरपेक्ष असल्याची प्रतिमाही त्यांनी बोलून दाखवली. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.
याच वादावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’हा वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. अनेक आखाती देशांनी भारतीय राजदूतांना बोलवून नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे त्याचे समर्थन या देशात कोणीही करणार नाही. भाजपाला या प्रकरणी देशासह संपूर्ण आखाती देशांकडे माफी मागावी लागत आहे.”राऊत यांनी अयोध्येत पत्रकार परिषदेत बोलतांना आपली भूमिका मांडली आहे.