नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाकडे कर्नाटकात कोणताही विश्वासार्ह चेहरा नाही म्हणूनच त्यांनी पुन्हा बीएस येडियुरप्पा यांचा हात पकडण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप कर्नाटक कॉंग्रेसचे आमदार प्रियांक खर्गे यांनी केला आहे.
येडियुरप्पा निवृत्त होण्याचा विचार करत नसताना त्यांना राजीनामा द्यायला लावल्याचा आरोपही या आमदाराने केला आहे
एएनआयशी बोलताना खर्गे यांनी म्हणाले की, “जर येडियुरप्पा यांच्याकडे भाजपला निवडून आणण्याची खरोखर क्षमता असेल तर भाजप त्यांना तिकीट का देत नाहीत?. येडियुरप्पा यांना अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी अलिकडेच आपण निवडणुकीच्या राजकारणातूनही निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.
परंतु राज्यातील विद्यमान भाजप नेतृत्वाकडे निवडणूक जिंकण्याची क्षमता नसल्याने भाजप श्रेष्ठींनी आता पुन्हा येडियुरप्पांना पुढे करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी त्यांनाही आता भाजपला यश मिळवून देता येणार नाही असेही प्रियांक खर्गे यांनी सूचित केले आहे.