भाजप सरकारची कर्जमाफी योजना पूर्णपणे फ्लॉप- काँग्रेस

मुंबई: कर्जमाफीवरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. भाजप सरकारने ‪८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र हि घोषणा फ्लॉप ठरली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांनी याबाबत पोस्ट केली आहे.

“‪८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा भाजप सरकारचा दावा सपशेल खोटा ठरला असून २७ महिने उलटूनही ५० टक्के शेतकरी आजही कर्जमाफी पासून वंचित आहेत. ‬‪भाजप सरकारची कर्जमाफी योजना पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे!”‬असे काँग्रेसने म्हटले आहे.

विरोधकांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला घेरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- कँग्रेसने जाहीर सभांमधून भाजपाला कर्जमाफी संदर्भात प्रश्न केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here