पश्चिम बंगालमधील हल्ल्यानंतर भाजपचे सरचिटणीस विजयवर्गीय यांना ‘बुलेटप्रुफ’ कार

कोलकाता – डायमंड हार्बर येथे भाजप नेत्यांच्या मोटारीवर दगडफेक झाल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर बंगालच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांना केंद्र सरकारने बुलेटप्रुफ मोटार पुरवली आहे.

चोवीस परगणा जिल्ह्यातील मथुरापुर येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांचे या राज्यात आज दुपारी आगमन झाले त्यावेळी त्यांना ही सुविधा पुरवण्यात आली आहे. स्वत: विजयवर्गीय यांनीच पत्रकारांना आज विमानातळावर ही माहिती दिली.

ते म्हणाले की, राज्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही उपाययोजना केली आहे. नड्डा यांच्या मोटार गाड्यांवर दगडफेक करण्याचा जो प्रकार झाला होता त्या मोटारीच्या ताफ्यात त्यावेळी विजयवर्गीय हेही सहभागी होते व त्यात ते किरकोळ जखमीही झाले होंते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.