भाजपात भूकंप; ३१ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत ?

औरंगाबाद : औरंगाबामध्ये युतीचे राजकारण चांगलेच तापले आहे. दिवसभराच्या राजकीय नट्यानंतर भाजप सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. उपमहापौरांच्या राजीनामा राजीनाम्यानंतर भाजपचे २३ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. ८ अपक्ष नगर सेवकदेखीक राजीनामा देण्याची शक्यता आहे .

महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी, भाजपचे शहरध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केली आहे .उपमहापौरांनी राजीमा दिल्यानंतर किशनचंद तनवाणी महापालिकेत दाखल झाले. माध्यमाच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी बोलताना सांगितलं, उपमहापौरानी दिलेला राजीनामा अचानक घडलेला प्रकार आहे. भाजपने याप्रकारचे कोणतेही आदेश दिले नव्हते.

आयुक्तांनी राजीनामा नामंजूर केल्यास औताडे पुन्हा उपमहापौरांच्या खुर्चीत बसू शकतात असा दावा त्यांनी केला. महापौर युतीचे असल्यामुळे आगोदर त्यांनी राजीनामा द्यावा, नंतर आमचे नगरसेवक राजीनामा देतील, असे तनवाणी म्हणाले.

दरम्यान शिवसेना-भाजप युती आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे भाजपच्या 23 नगरसेवकांसह सोबत असलेल्या आठ अपक्ष नगरसेवकांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.