BTC Election: भाजपची जुन्या सहकारी पक्षाला सोडचिठ्ठी देत UPPLशी हातमिळवणी

गुवाहाटी – बोडो लॅंड टेरिटेरियल कौन्सिलच्या निवडणुकीत त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्यानंतर भाजपने तेथील आपल्या जुन्या सहकारी पक्षाला सोडचिठ्ठी देत कट्टरपंथीय नेता प्रमोद बोडो यांच्या युनायटेड पिपल्स पार्टी लिबरल या पक्षाशी हातमिळवणी करून तेथील सत्ता हस्तगत केली आहे.

आता भाजपच्या पाठिंब्यावर प्रमोद बोडो हे त्या कौन्सिलच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. 40 जागांच्या या कौन्सिल मध्ये बोडो पिपल्स फ्रंटला सर्वाधिक 17 जागा मिळाल्या. युपीपीएल पक्षाला 12 तर भाजपला नऊ जागा मिळाल्या.

कॉंग्रेस आणि जीएसपीला प्रत्येकी एक जागा मिळाली. बोडो पिपल्स पार्टीची राज्यातील सरकार मध्ये भाजपशी आघाडी आहे. त्यामुळे भाजपने या कौन्सिल मध्येही बोडो पिपल्स पक्षाला समर्थन द्यावे असे आवाहन त्या पक्षातर्फे करण्यात आले होते. पण भाजप नेत्यांनी ते फेटाळून लावत दुसरा घरोबा केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.