मोदींच्या गुजरातमध्ये ‘आप’ची पुन्हा कमाल; स्थानिक निवडणुकीतही उघडलं खातं

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. राज्यात नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीच्या  ८,४७४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप २०८१ जागांवर आघाडीवर आहे. यासाठी रविवारी मतदान झाले होते. मात्र गुजरातमध्ये पुन्हा एकदा आम आदमी पक्षाने कमाल दाखवली आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या महानगर पालिका निवडणुकीत खातं उघडणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही चांगली कामगिरी केली. एकूण १५ जागांवर आपने विजय मिळवला आहे.

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे. त्यापूर्वी ८१ पैकी ७५ नगर पालिकांमध्ये भाजपचा दबदबा आहे. तर चार नगरपालिकांमध्ये काँग्रेस आणि दोन ठिकाणी आपने वर्चस्व मिळवले आहे. तर सर्वच्या सर्व ३१ जिल्हा परिषदांमध्ये भाजप आघाडीवर असून २३१ पंचायत समिती निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली आहे. तर ३३ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.