भाजप नगरसेवकाने घेतले, काँग्रेस नगरसेवकाचे चुंबन

कोल्हापूर : कोल्हापूर महानगर पालिकेत आज अजब प्रकार घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधी हे एकमेकांच्या विरोधात आपण हाणामारी करताना पहिली असेल, पण आज महापालिकेत वेगळा प्रकार पाहायला मिळाला आहे. भाजपा नगरसेवक कमलाकार भोपळे यांनी काँग्रेस नगरसेवक शारंगधर देशमुख यांचे चक्क सर्वांसमोर चुंबन घेतले आहे. या घडलेल्या प्रकारामुळे महापालिकेत एकच हशा पिकला.

नेमकं झालं असे कि आज कोल्हापूर महापालिकेत महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्या राजीनाम्यासाठीची सभा सुरु होती. त्यावेळी विरोधी बाकांवर बसलेले भाजप नगरसेवक कमलाकार भोपळे हे थेट सत्ताधारी काँग्रेसच्या बाकावर जाऊन बसले. मला भाजप किंमत देत नाही, तेवढी किंमत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिली जाते असे म्हणत त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख यांचं चुंबन घेतले.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.