“भाजप प्रवेश देणे सुरू आहे…’ 

तळटिपेद्वारे शिवसेनेवरही शब्दबाण

2014 च्या लोकसभा निवडणुकीत “ना खाऊंगा ना खाने दूंगा’ अशी गर्जना नरेंद्र मोदी यांनी दिली होती. तर, राज्यातही स्वच्छ, पारदर्शक, गतिमान तसेच भ्रष्टाचारमुक्त सरकारचे आश्‍वासन भाजपने दिले. मात्र, 2019 लोकसभा निवडणूक आणि आता विधानसभेच्या तोंडावर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांना पक्षात स्थान दिले आहे. त्यामुळे हे पोस्टर लावताना, त्यात भाजप प्रवेशासाठी अटी व शर्थी देण्यात आल्या आहेत. त्यात पहिली अट “ईडी व आयकर विभागाची नोटीस आलेली असणे’, दुसरी अट “भ्रष्टाचाराचा आरोप आहे’ तिसरी अट “सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव आहे.’ पोस्टरवर टीपही देण्यात आली असून त्यात “विचारधारेची कोणतेही अट नाही तसेच आमच्याकडे जागा नसल्यास मित्र पक्षात प्रवेश दिला जाईल’ असे नमूद करण्यात शिवसेनेचीही खिल्ली उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पुणे – निवडणुकांच्या तोंडावर “भाजप प्रवेशासाठी मेगा भरती’ सुरू असल्याची खिल्ली उडविली जात आहे. यावर टीका करण्यासाठी पुण्यात “भाजप प्रवेश देणे आहे’ असे पोस्टर हडपसर परिसरात झळकविण्यात आले आहेत. हा विषय सोशल मीडियावर चर्चेचा झाला आहे. दरम्यान, हे पोस्टर विरोधकांनी लावले, की या पक्ष प्रवेशाला कंटाळलेल्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी? या वरून राजकीय चर्चेला शहरात उधाण आले आहे.

निवडणुकांच्या तोंडावर भाजपने राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचा डाव खेळला असून शरद पवार यांच्यासोबत गेलेल्या राजकीय घराण्यांच्या प्रतिनिधींना पक्षात घेण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यावर नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच हे पोस्टर चर्चेचा विषय बनले आहेत. दरम्यान, भाजपकडून सुरू असलेल्या पक्ष प्रवेशांच्या राजकीय घडामोडींवर सोशल मीडियात खरमरीत चर्चा सुरू असतानाच; पुण्यात आता थेट भाजपमध्ये प्रवेश देण्याचे पोस्टरच झळकले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)