धर – मध्य प्रदेशातील बदनवार येथे उद्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे, त्याच्या आदल्यादिवशीच तेथे भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. त्यात सहा जण जखमी झाले.
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या तिलागरा भागात समोरासमोर आल्या. त्यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन ही हाणामारी झाली. रात्री एकच्या सुमाराला हा प्रकार घडला. या प्रकरणात चार महिलांसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला तरी पोलिसांनी मात्र कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे, गुन्हे दाखल केले, असा आरोप मध्य प्रदेश प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस कुलदीपसिंग बुंदेला यांनी केला आहे. भाजपच्या नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच आमच्यावर हल्ला केला, असे म्हटले आहे.