नागपुरमध्ये भाजप-कॉंग्रेस कार्यकर्ते भिडले

नागपुर – नागपूरत भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्ते पुन्हा एकदा एकमेकांना भिडल्याने मोठा गोंधळ उडाला. नागपुरमधील संघ मुख्यालयाच्या परिसरात भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यानंतर त्यांच्यात वादावादी झाली आणि धक्‍काबुक्‍की झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर, हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागल्याचेही दिसून आले.

कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई व अन्य केंद्र सरकारविरोधी मुद्द्यांवर एक रॅली आयोजीत केली होती. संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असून, सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तिथूनच रॅली नेण्याचा हट्ट धरला.

त्यावर तेथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यास विरोध दर्शवला. यामुळे वाद निर्माण झाला व दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते भिडले, असे सांगण्यात आले आहे.

तर, परिस्थितीची गांभीर्य पाहून घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केला व पोलिसांची जादा कुमकही मागवली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून मागे जावे लागले, असे देखील सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.