अटकेतील कॉंग्रेस नेत्याच्या कुटुंबियांचे भाजपकडून सांत्वन

कोलकाता – पश्‍चिम बंगाल मधील ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात टीका करणारी पोस्ट टाकल्याबद्दल कॉंग्रेस नेते समनय बंडोपाध्याय यांना गुरूवारी अटक करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने आज त्यांच्यार्‌ घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन करून त्यांना समर्थन दिले.

बंडोपाध्याय यांना गुरूवारी सायंकाळी पुरूलिया जिल्हा पोलिसांनी त्यांच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील घरातून अटक केली. सरकारच्या विरोधात सोशल मिडीयात पोस्ट टाकली या एका क्षुल्लक कारणाने त्यांना करण्यात आलेली अटक दुर्देवी आहे.

आणिबाणीच्या काळात अशा घटना घडत असत. तशीच स्थिती आज पश्‍चिम बंगाल मध्ये झाली आहे. आज या राज्यात अघोषित आणिबाणी आहे असा आरोप भाजप नेत्यांनी केला. त्यांच्या अटकेचा लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांनीही निषेध केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.