मुंबई – मराठा क्रांती मोर्चाच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी(दि.27 मे) माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भात भेट घेतली. यावेळी 50 टक्क्यांच्या आतील आरक्षण व इतर बाबींवरील एक निवेदन त्यांनी यावेळी दिले.
मराठा क्रांती मोर्चाच्या एका शिष्टमंडळाने आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भात भेट घेतली. 50 टक्क्यांच्या आतील आरक्षण व इतर बाबींवरील एक निवेदन त्यांनी यावेळी दिले. @Dev_Fadnavis pic.twitter.com/uJBwoLXJ4p
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) May 27, 2022
यादरम्यान, शिष्टमंडळाशी चर्चा करताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जोवर मराठा समाज मागास घोषित होत नाही, तोवर आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे ती प्रक्रिया आधी करावी लागेल. मराठा आरक्षणासाठी भाजपा कटिबद्ध आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.