सातारा – सातारा शहर कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यकम 7 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वाजता येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात होणार आहे.
याठिकाणी सातारा शहर कार्यकारिणी, सातारा शहर महिला मोर्चा, युवा मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, युवती मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा तसेच सातारा शहर कायदा आघाडी, वैद्यकीय आघाडी, कामगार आघाडी, व्यापार आघाडी, औद्योगिक आघाडी, सांस्कृतिक आघाडी, क्रीडा आघाडी, सहकार आघाडी, झोपडपट्टी आघाडी, भटके विमुक्त आघाडी, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी, सोशल मीडिया आघाडी अशा विविध कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिली.
जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी तयार होत आहे. या मेळाव्यासाठी आणि निवडी जाहीर करण्याच्या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, आ. शिवेंद्रसिहराजे भोसले, कोअर कमिटी सदस्य दत्ताजी थोरात आणि सुवर्णताई पाटील, सातारा नगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
सातारा शहराच्या तयार होणाऱ्या या कार्यकारिणीमध्ये सातारा शहराच्या सर्व भागांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख , आजी माजी नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन गोसावी यांनी केले आहे