भाजपने चौथा उमेदवार बदलला

मुंबई – विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने चौथा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून रमेश कराड भाजपचे चौथे उमेदवार असतील. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (11 मे) शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबतच भाजपकडून रमेश कराड यांनीही उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.

रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.