चिंचवडमधून जगतापांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात महत्वपूर्ण मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या चिंचवड मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ एकच दिवस बाकी असतानाही अद्यापही इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त सापडलेला नाही.

गुरूवारी भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप यांनी एकमेव आपला अर्ज दाखल केला आहे. इतर इच्छुकांचे शुक्रवारी अर्ज दाखल होण्याची शक्‍यता असल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यास मोठी गर्दी होणार आहे. गुरुवारी आणखी 6 इच्छुकांनी 18 अर्ज नेले आहेत.

27 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज भरायला प्रारंभ झाला. गुरुवारपर्यंत एकूण 45 जणांनी 103 अर्ज नेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अर्जाची विक्री झाली असली तरी केवळ भाजप, शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप यांनीच आपले चार उमेदवारी अर्ज दाखल
केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.