“भाजपच्या हस्तकानेच गोंधळ माजवला”

दिल्ली हिंसाचार प्रकरणात आम आदमी पक्षाचा आरोप

नवी दिल्ली – दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात काल जो हिंसाचार झाला त्याला भाजपचा हस्तक दीप सिद्धु हाच जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

आज येथे या संबंधात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या पक्षाचे प्रवक्ते राघव चढ्ढा म्हणाले की लाल किल्ला परिसरात हिंसाचार माजवणे हा भाजपचाच नियोजनबद्ध डाव होता व त्याचे सूत्रसंचालन दीप सिद्धु यानेच केले.

दीप सिद्धु आणि भाजपचे कसे संबंध आहेत या संबंधातील छायाचित्रे व ठोस पुरावेही त्यांनी यावेळी सादर केले. लाल किल्ल्यावर दीप सिद्धु यानेच झेंडा फडकावण्याचे काम केले असा आरोप त्यांनी केला.

तो गेल्या लोकसभा निवडणुक काळात गुरूदासपुर मतदार संघात भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार सनी देवल यांचा सहकारी होता असा आरोपही त्यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.