कोलकाता – राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत तृणमुल कॉंग्रेसचे उमेदवार जवाहर सिरकार हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्याची औपचारीक घोषणा अद्याप बाकी आहे. भारतीय जनता पक्षाने या जागेसाठी उमेदवार दिला नव्हता, त्यामुळे त्यांची ही निवड बिनविरोध झाली.
या जागेसाठी त्यांच्या एकट्याचाच अर्ज आला आहे. सिरकार हे प्रसार भारतीचे माजी सीईओ आहेत. तृणमुल कॉंग्रेसचेच पुर्वाश्रमीचे नेते दिनेश त्रिवेदी यांनी या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घ्यावी लागली.
त्यांच्या जागी सिरकार यांच्या उमेदवारीची घोषणा तृणमुल कॉंग्रेसने 28 जुलै रोजीच केली होती. त्यांच्या अर्जाची आज छाननी झाली. ती वैध ठरल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा 2 ऑगस्टला होणार आहे.