सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात पदयात्रांचा धडाका सुरु आहे. त्यामुळे वातावरण भाजपमय झाले आहे. आम्हा दोघांमुळे शहरात अनेक विकासकामे झाली असून अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. शहराच्या विकासासाठी भाजप हाच एकमेव पर्याय असून सातारकरांनी साथ द्यावी, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
बुधवारच्या पदयात्रेचा मार्ग
बुधवार, दि. 9 रोजी सकाळी 7 वाजता शाहू चौक (पालिका कार्यालय), कुंभार वाडा, आयडीबीआय बॅंक, शिक्षक बॅंक, तहसील कार्यालय, भाजी मंडई, सैनिक कॉलनी, ओम सुंदर फोटो, श्रीनाथ मंदिर चौक, लकी आर्टस्, पावन हनुमान मंदिर, जगताप कॉलनी, ऍक्सिस बॅंक, भोसले मळा, कर्मवीर सोसायटी, सेनॉर चौक, मल्हार पेठ, तपासे गल्ली, पोलीस ठाणे या मार्गावर पदयात्रा निघणार आहे.
उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी प्रभाग 14 व 15 मध्ये पदयात्रा झाली. प्रारंभी उमेदवारांनी फुटका तलाव गणपती मंदिरात दर्शन घेतले. तेथून एकता चौक, गोल मारूती मंदिर, दत्त मंदिर, पेंढारकर हॉस्पिटल, माटेराम मंदिर, रेणुका मंदिर, सोन्या मारुती मंदिर मारवाडी चौक अशी पदयात्रा झाली. नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, धनंजय जांभळे, अमोल मोहिते, प्राची शहाणे, सुजाता राजेमहाडिक, यशोधन नारकर, विकास गोसावी, उद्योजक दत्ताजी थोरात, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक जनार्दन जगदाळे, प्रवीण पाटील, कल्याण राक्षे, दिगंबर भोसले, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, जयदीप ठुसे, राजू गोडसे, विनोद कुलकर्णी, चंद्रशेखर घोडके, राजू भोसले, गणेश यादव, मुराद बागवान, इम्रान कोतवाल, सादिक महाडवाले, साई सावंत, सारंग गुजर, नंदकुमार चक्के, अमोल गुजर, दीपक पाटील, भाऊ डागा, राहुल खैरमोडे, लहुराज जाधव, शाहीद बागवान, हर्षल चिकणे, रवींद्र पवार, चंदन घोडके, प्रशांत गोळे, विठ्ठल बलशेटवार, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
पदयात्रेत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत केले. महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले. शिवेंद्रराजे म्हणाले, राजघराणे आणि सातारकरांचे नाते अतूट आहे. जनतेने भाजपला मतदान करून नवा इतिहास घडवावा. आम्हाला तुमचा आशीर्वाद आणि साथ मिळाल्यास भाजपच्या माध्यमातून मतदारसंघाचा चौफेर विकास करू.