शिरूरमध्ये भाजपकडून बाबूरावजी पाचर्णे यांना उमेदवारी जाहीर

शिरूर – शिरूर विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टी कडून विद्यमान आमदार बाबूरावजी पाचर्णे यांना आज उमेदवारी जाहीर झाली असून यामुळे शिरूर हवेली तालुक्यात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
तर आमदार बाबूराव पाचर्णे 3 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर हवेली तालुक्‍यात गेल्या अनेक दिवसापासून भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार यावर मोठी चर्चा सुरू होती कोणी तळी मोठा मासा भाजपच्या गळाला लागला असे बोलले जात होते परंतु भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिल्या यादीत आमदार बाबुराव पाचर्णे यांचे उमेदवारी जाहीर केल्याने या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

तर शिरूर-हवेली तून आपल्याला उमेदवारी जाहीर होणार असे छातीठोकपणे आमदार बाबूराव पाचर्णे नेहमी सांगत होते.त्यांनी केलेली विकासकामे आणि त्यांचा आत्मविश्वास यामुळे अखेर उमेदवारीची माळ आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या गळ्यात पडल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला.सोशल मीडिया च्या माध्यमांनी अनेकांनी आमदार बाबूराव पाचर्णे यांना शुभेच्छा दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.