मुंबई: नुकतच प्रश्नम या संस्थेने त्यांचा त्रैमासिक अहवाल जाहीर केला. यात भारतातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अव्वल ठरले आहेत. असं असले तरी विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर आणि सरकारवर सतत टीका होत असते यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाला सुनावले आहे. या सर्वेक्षणाचा हवाला देत त्यांनी भाजपाला वाईट वाटून न घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रोहित पवार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘प्रश्नम’ या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे #मविआ सरकारचं यश आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 15, 2021
काय म्हणाले रोहित पवार
”प्रश्नम’ या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे #मविआ सरकारचं यश आहे.’
ते पुढे म्हणाले,’उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!’