-->

गजानन मारणेने काढलेल्या मिरवणुकीवरून भाजप आक्रमक; चित्रा वाघ म्हणाल्या…

मुंबई  कारागृहातून बाहेर पडताच मिरवणुकीचा थाट मांडत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड गजानन ऊर्फ गज्या मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फटाके फोडून तब्बल 300 वाहनांच्या ताफ्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण केले. यावरून भाजप देखील आक्रमक झाले असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राज्यात रोज खून हल्ले बलात्काराच्या घटना तर घडतातच पण तुरुंगातून सुटका झाल्यावर एखादा नामचीन गुंड मिरवणूक काढायची हिंमत करतो. कोणीही गुंड खुलेआम दणक्यात वाढदिवस साजरे करायची हिंमत करतो. हे चांगल्या समाजासाठी लाजीरवाणं आहेच पण हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचाही पुरावा असल्याचं म्हणच चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

राज्यात करोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे दूर झाले नाही, त्यामुळे सर्वत्र गर्दीवर बंधने आहेत असे असताना कारागृहातून सुटका झालेल्या गुंडाची मिरवणूक काढण्यात आली, हा धक्‍कादायक प्रकार सोमवारी (दि. 15) रात्री साडेआठच्या सुमारास समोर आला. पुणे-मुंबई द्रुतगतीवर तब्बल 300 हून अधिक वाहनांचा ताफा सोबत घेत गुंड गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.