‘भाजपने गाव दत्तक घेवून विकास करणे ही संकल्पना धुळीस मिळवली’

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर भाजपवर टीका केली आहे. भाजप  खासदारांनी गाव दत्तक घेवून त्याचा विकास करणे ही संकल्पना धुळीस मिळवल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेले आंबवडे गाव हे दत्तक घेतले. गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ३७३ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. मात्र, त्यापैकी फक्त १९ लाख ४३ हजार रुपये खर्च करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

तसेच काही वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याची विहीर कोसळली. ती अजूनही पडीक अवस्थेत आहे. संपूर्ण गावात फक्त पाच स्वच्छतागृह उपबल्ध आहे. हाच का भाजपाचा विकास म्हणायचा ? असा प्रश्न देखील राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)