बिटकॉईन व्यवहार केल्यास होणार शिक्षा

नवी दिल्ली – बिटकॉईनने व्यवहार करणाऱ्यांना तुरुंगांची हवा खावी लागणार आहे. केंद्र सरकार संसदेच्या आगामी अधिवेशनात डिजिटल करन्सी विधेयक आणणार आहे. त्यानुसार बिटकॉईनने व्यवहार केल्यास 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सी प्रतिबंध आणि डिजिटल करन्सी नियमन 2019 हे विधेयक आणले आहे. या विधेयकात क्रिप्टोकरन्सी बाळगणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

बिटकॉईन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी मानली जाते. क्रिप्टोकरन्सी ही अभासी चलन आहे. क्रिप्टोकरन्सीने व्यवहार केल्यास कुठलाच पुरावा राहात नाही. त्यामुळे सरकारी विभागाने या चलनावर बंदी घातली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या सल्ल्यानंतरच डिजिटल करन्सी सुरू करण्यात येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.